लोकमंगल परिवार आयोजित
सोलापूर जिल्हा पर्यटन सप्ताह २०२६
दि. २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६
मा. आ. सुभाष बापू देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
सोलापूर जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक व पर्यटनस्थळांची प्रसिद्धी वाढावी, जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी आणि स्थानिक पर्यटन व्यवसायास प्रोत्साहन मिळावे.
🟢 पर्यटन सप्ताहासाठी पूर्वनोंदणी
दि. २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६
मला पर्यटन सप्ताहात सहभागी व्हायचे आहे.
➡️ नोंदणी करा🟠 पर्यटन प्रवासानंतरचा अहवाल
मी पर्यटन सप्ताहात सहभागी झालो असून प्रवासाची माहिती सादर करायची आहे.
➡️ अहवाल सादर करा
⭐ महत्त्वाची सूचना: ₹१,०००/- विशेष अर्थसहाय्य हे पर्यटन सप्ताहाचे नियम पूर्ण करून Phase 2 submission आणि verification पूर्ण केलेल्या पात्र सदस्यांनाच लागू राहील.
सहभागी न होणाऱ्या सदस्यांसाठी ₹५०१/- लोकमंगल अन्नपूर्णा योजनेसाठी योगदान.
नियम व अटी
- स्वतंत्रपणे पर्यटन प्रवास लोकमंगल परिवारातील सदस्यांनी एकत्रितपणे किंवा कार्यालयीन ग्रुपच्या स्वरूपात पर्यटन प्रवास करू नये. प्रत्येक सदस्याने स्वतंत्रपणे आपल्या कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळींसोबत सहभागी व्हावे.
- सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनाला प्राधान्य शक्यतो सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांनाच भेट देणे अपेक्षित आहे.
- पर्यटन सप्ताहाचे स्टिकर प्रवास सुरू करण्यापूर्वी वाहनावर कार्यालयाकडून देण्यात आलेले ‘सोलापूर जिल्हा पर्यटन सप्ताह’ स्टिकर लावणे अनिवार्य राहील.
- सोशल मीडिया प्रसिद्धी भेट दिलेल्या पर्यटनस्थळाची माहिती, छायाचित्रे व अनुभव Facebook, Instagram, WhatsApp वर प्रसिद्ध करावा व पोस्टची लिंक कार्यालयाकडे पाठवावी.
- जास्तीत जास्त सहभाग जास्तीत जास्त सदस्यांनी सहभागी व्हावे.
- विभागाची पूर्वपरवानगी प्रवासापूर्वी विभागाकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
- विशेष अर्थसहाय्य पात्र सदस्यांना ₹१,०००/- विशेष अर्थसहाय्य त्यांच्या सॅलरी अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल.
- सहभागी न होणाऱ्या सदस्यांसाठी सामाजिक योगदान सहभागी न होणाऱ्या सदस्यांनी ₹५०१/- लोकमंगल अन्नपूर्णा योजनेसाठी योगदान द्यावे.
- उपक्रमाचा मुख्य हेतू कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण, सोलापूर जिल्ह्याची ओळख वाढवणे, स्थानिक पर्यटनाला प्रोत्साहन व सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी.
- कार्यालयीन नियमांचे पालन संस्थेच्या शिस्तीचे, वाहतूक नियमांचे व पर्यटनस्थळाच्या नियमांचे पालन आवश्यक.
चला... कुटुंबासोबत पर्यटन करूया!
सोलापूर जिल्हा पाहूया... सोलापूर जिल्हा जगाला दाखवूया!
लोकमंगल परिवाराच्या या अभिनव उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला हातभार लावूया.